ग्रामपंचायत वाकी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

वाकी-बिटुर्लीचे काम राज्यात दिशादर्शी

ग्रामपंचायत केवळ प्रशासकीय यंत्रणा नसून लोकशाहीचा पाया आहे. वाकी- बिटुर्ली ग्रामपंचायतीने योग्य नियोजन, लोकसहभाग आणि प्रामाणिक अंमलबजावणी असेल तर ग्रामविकास कागदावर न राहता जमिनीवर उतरतो हे दाखवून दिले आहे. प्लास्टिकमुक्त उपक्रम, स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा, घरकुल योजना आणि महिला सक्षमीकरण हे सर्व राबविणे म्हणजे खरे ‘समृद्ध पंचायत राज’. अशा ग्रामपंचायती राज्यासाठी दिशादर्शक ठरतात, इतर ग्रामपंचायतींनी वाकी-बिचुर्तीचा आदर्श घ्यावा असे आवाहन पंचायतराज विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांनी केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत वाकी बिटुर्ली (ता. इगतपुरी) येथे त्यांनी शुक्रवारी (ता. २३) राज्यस्तरीय पाहणीअंतर्गत भेट दिली. गावांची कामे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ व महेश पाटील तसेच इगतपुरीचे गटविकास अधिकारी महेश वळवी आदी याप्रसंगी उपस्थित होते.

वाकी पंचायतराज कार्यक्रमात बोलताना मुख्य सचिव एकनाथ डवले. शेजारी मान्यवर.

वाकी बिटुलीँअंतर्गत कापडी पिशव्या तयार करणारे मशीन तसेच शुद्ध पाणी फिल्टर व वॉटर एटीएमचे उद्घ उद्घाटन करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना चाव्यांचे वाटप तसेच नागरिकांना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले. समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत वाकी बिदुर्लनि राबविलेला उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला. गावातील लग्नसमारंभ व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्लास्टिक व थर्माकोल प्लेट्सचा वापर पूर्णतः बंद करून स्टीलच्या प्लेट भाड्याने उपलब्ध करून देण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा

हा उपक्रम असल्याचे सांगत श्री. डवले यांनी गावाचे विशेष कौतुक केले.

या दौऱ्यादरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख, काननवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. कोळी यांनी सिकलसेल सोल्युबिलिटी स्टेट कॅम्प, आरोग्य तपासणी शिबिर, गोल्डन कार्ड, आबा कार्ड कॅम्पचे आयोजन केले होते. घरकुलांची प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांनी कामाच्या गुणवत्तेचे समाधान व्यक्त केले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी मंजूषा साळुंखे व ग्रामपंचायत अधिकारी डॉ. ज्योतीताई केदारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *