ग्रामपंचायत वाकी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

वाकीत महिला सक्षमीकरण उपक्रम

वाकीत महिला सक्षमीकरण उपक्रम वाकी ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज

अभियानांतर्गत ग्राहक रक्षक समिती, मनू मानसी महिला संस्था, साई धन वर्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम राबविण्यात आला. दिव्यांग निधी वाटप, एकूण ९०० कुटुंबांना फराळ, २५० कुटुंबांना साड्या-कांबळे, १५० नागरिकांना दाखले व ५० नागरिकांना ई-श्रम व गोल्डन कार्ड देण्यात आले. यावेळी ग्राहक रक्षक समिती अध्यक्षा डॉ. आशा पाटील, साई धन वर्षा फाउंडेशन अध्यक्ष संजय देशमुख, मनू मानसी महिला संस्थाध्यक्षा मेघा शिंपी, महावीर इंटरनॅशनल संस्थाध्यक्ष अनिल नहार आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी डॉ. ज्योती केदारे यांच्या पुढाकाराने दरमहा अशा उपक्रमांमुळे ग्रामपंचायतीबद्दल नागरिकांमध्ये समाधान वाढले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *