1. योजनाच्या पूर्वीची परिस्थिती
वाकी-बिटूर्ली गावात सन १९९३ पूर्वी , खाजगी विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत होते.त्यांनतर सन २०१३-१४ रोजी गावात तलाव व विहीर बांधकाम झाल्याने तेथील पाणी पिण्यासाठी व वापरासाठी वापरू लागले त्यांनतर १००००० क्षमतेची जमिनीवरील पाणीटाकी बांधून देण्यात आली. संपूर्ण योजना पाईपलाईन देखभाल दुरुस्तीसह ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली. परंतु सदर पाईप लाईनला गळती होऊन ती ग्रामपंचायत ने पंधरावित्त आराखडा मधून पाईप लाईन दुरुस्ती करण्यात आली. व गावांना वैयक्तिक नळ योजना या मधून देण्यात आली.व आज रोजी पाणीपुरवठा होत आहे.
2. पाणी पुरवठा योजनेला जोडलेल्या महसुली गाव/वाडी, वस्ती यांची संख्या व नाव
वाकी ता.इगतपुरी जि.नाशिक.बिटूर्ली हे महसुली गाव असून त्याअंतर्गत डहाळेवाडी,रेरेवाडी मेंगाळवाडीह्या ३ वस्त्या आहेत.
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत पूर्ण झालेली कामे
वाकी ग्रामपंचायत अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकास योजनेंतर्गत शाश्वत पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे.
श्रमदान व लोकसहभागातून स्वच्छ गाव मोहिमेकडे
वाकी ग्रामपंचायतने गावामध्ये स्वच्छ भारत अभियान व ग्रामीण स्वच्छता अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवले आहेत. यामुळे गावात स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला जात आहे.
🏡 प्रधानमंत्री आवास योजना – वाकी ग्रामपंचायत
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना पक्के, सुरक्षित व मूलभूत सोयी असलेले घरे उपलब्ध करून दिली जातात.
हर घर तिरंगा – वाकी गाव
आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत वाकी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या घरांवर तिरंगा फडकवून राष्ट्रीय एकात्मता, अभिमान आणि देशभक्तीचा संदेश दिला. या उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.